wrapper

Breaking News

Has no content to show!

काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या मुहूर्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच लवकरच मोठा ‘राजकीय भूकंप’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील १२ ते १६ खासदार भाजपच्या गळाला लागले असल्याचा दावा राज्यातील भाजप नेत्यांनी केला आहे. त्यातील अनेक खासदारांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात ३५० हून अधिक खासदार निवडून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. ‘भाजपमध्ये आपले स्वागत आहे’ असे खुले निमंत्रणही भाजपच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप नेते चर्चेतील नेत्यांचे अधून-मधून ‘स्वागत’ही करताना दिसत आहेत. ‘घुसमट’ होत असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असे एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

पक्ष किंवा नेतृत्वावर जे लोक नाखूश आहेत. ज्यांना भाजपत प्रवेश करण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्यासाठी भाजपची दारे खुली आहेत, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त नुकतेच इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. त्यामुळे भंडारी यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

Last modified on Wednesday, 13 September 2017

Leave a comment

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners