wrapper

Breaking News

Has no content to show!

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (क्रूड ऑईल) दरात कमालीची घट आल्यामुळे व्हेनेज्युएलामध्ये पेट्रोलचे दर 1 रुपया 36 पैसे प्रतिलिटरवर आले आहे.

भारताची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 59 रुपये 99 पैसे प्रति लिटर आहे, तर शेजारी असलेल्या पाकिस्तानात पेट्रोल प्रतिलिटर 49 रुपये 47 पैसे या दराने विक्री होत आहे. जाणून घेऊया जगभरातील देशातील पेट्रोलचे दर...

व्हेनेज्युएलामध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल... जगभरात व्हेनेज्युएलामध्ये सर्वात स्वस्त दरात पेट्रोल मिळत आहे. येथे पेट्रोलचे दर प्रति लिटर 1 रुपया 36 पैसे आहे. दरम्यान, आंतरराष्‍ट्रीय बाजारात क्रुड ऑइलच्या दरात झपाट्याने कपात होत आहे. त्यात व्हेनेज्युएला हा क्रूड ऑइल एक्सपोर्ट करणारा देश आहे. व्हेनेज्युएलामध्ये जनतेला पेट्रोलवर सर्वात जास्त अनुदान (सबसिडी) मिळते.

या देशांमध्ये मिळते भारताच्या तुलनेत स्वस्त दरात पेट्रोल...

भारताची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 59 रुपये 99 पैसे प्रति लिटर आहे.

1. व्हेनेज्युएला: 1 रुपया 36 पैसे
2. सौदी अरब: 15 रुपये 59 पैसे
3. इराण: 21 रुपये 68 पैसे
4. अमेरिका: 39 रुपये 40 पैसे
5. पाकिस्तान: 49 रुपये 47 पैसे

(एक डॉलर: 67.76 रुपये)

देशात मिळते भारताच्या तुलनेत महाग दरात पेट्रोल...

भारताची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 59 रुपये 99 पैसे प्रति लिटर आहे.

1. बांगलादेश: 80 रुपये 64 पैसे
2. ब्रिटनः 98 रुपये 26 पैसे
3. हॉंगकॉंग: 121 रुपये 97 पैसे
(एक डॉलर: 67.76 रुपये)
Last modified on Monday, 25 January 2016

Leave a comment

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners