wrapper

Breaking News

Has no content to show!

आर्थिक व्यवहार कुठलाही असो, अॅड्रेस प्रूफ (Address Proof) हे महत्त्वाचे दस्ताऐवज समजले जाते

. तुमच्याकडे अॅड्रेस प्रूफ नसेल तर तुम्ही कोणत्याही आर्थिक संस्थांकडून अर्थ साहाय्य घेऊ शकत नाही. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, की अॅड्रेस प्रूफ बनवणे आला अत्यंत सोपे झाले आहे. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून स्वत:चे कलर फोटो Address Proof बनवू शकतात.


पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कलर अॅड्रेस प्रूफ बनवण्याविषयीची माहिती आम्ही आपल्याला या पॅकेजमध्ये सांगणार आहोत.

लोकल अॅड्रेस प्रूफची आवश्यकता कशासाठी?

लोकल अॅड्रेस प्रूफ नसेल तर पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड सारखे डाक्युमेंट् बनवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. विशेष म्हणजे तुमच्याकडे अॅड्रेस प्रूफ असेल तर तुम्हाला फोन, गॅस, वीज पाणी कनेक्शन सहज मिळते. पोस्ट ऑफिसने बहुतांश नागरिकांच्या अॅड्रेस प्रूफची समस्या सोडवली आहे.

स्पीड पोस्टने स्वत:च्या घरी पाठवा पत्र...
लोकल अॅड्रेस प्रूफ बनवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्वत:च्या अॅड्रेसवर स्पीड पोस्टने पत्र पाठवावे. पत्र मिळाल्यानंतर पत्राचा लिफाफा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावा.

पोस्ट ऑफिसातून मिळेल एक फॉर्म, किंमत दहा रुपये
पोस्ट ऑफिसच्या प्रभारीशी संपर्क साधावा. त्याच्याकडून अॅड्रेस-आयडी प्रूफ बनवण्यासाठी माहिती घ्यावी. तो तुम्हाला एक फॉर्म देईल. तुम्ही हा फॉर्म इंटरनेटवरूनही डाउनलोड करू शकतात. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी पुढील URL वर क्लिक करा...http://www.indiapost.gov.in/Pdf/PO_ID_Cards_Application_Form.pdf

240 रुपये शुल्क भरावे
पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 240 रुपये शुल्क भरावे लागतील. यासोबत दोन कलर फोटो (व्हाइट बॅकग्राउंड), ब्लड ग्रुप डिटेल्स परर्मनन्ट अॅड्रेस प्रूफची झेरॉक्स कॉपी सादर करावी लागेल.

पोस्ट ऑफिसातून करण्यात येईल अॅड्रेस प्रूफचे व्हेरीफिकेशन
फॉर्म सादर केल्यानंतर पोस्ट ऑफिसातून तुमच्या अॅड्रेसवर व्हेरिफिकेशन करण्यात येईल. व्हेरिफिकेशन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पोस्ट ऑफिसातून कलर फोटो आयडी कार्ड दोन महिन्यांच्या कालावधीत तुमच्या अॅड्रेसवर प्राप्त होईल. या फोटो आयडी कार्डला तुम्ही अॅड्रेस आयडी प्रूफ म्हणून वापर करू शकतात.

तीन वर्षांसाठी व्हॅलिड राहिल कार्ड...
पोस्ट ऑफिसातून बनवलेल्या कलर फोटो अॅड्रेस प्रूफची व्हॅलिडिटी तीन वर्षांसाठी राहिल. मुदत संपण्याआधी तुम्ही हे कार्ड रिनुअलही करू शकतात. यासाठी 150 रुपये शुल्क आकारण्यात येते. तुमचे कार्ड गहाळ झाल्यास डुप्लीकेट कॉपीसाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येतो.

Last modified on Thursday, 07 January 2016

Leave a comment

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners