wrapper

Breaking News

Has no content to show!

मुंबई- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने "पवन हंस िलमिटेड' या कंपनीबराेबर सहकार्य करार करून अाता मुंबईत हेली-टुरिझमला प्रारंभ केला अाहे.

भारतात अशाप्रकारे राबवण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे.१० मिनिटांच्या या आनंदयात्रेसाठी जुहू विमानतळावरून दररोज हे हेलिकॉप्टर उपलब्ध असतील. राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते बुधवारी सकाळी या हवाई पर्यटनाचा शुभारंभ करण्यात अाला. पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या सचिव वल्सा नायर सिंग या वेळी उपस्थित हाेत्या.

‘हेली-टुरिझममुळे पर्यटकांना अधिकाधिक चांगला अनुभव मिळावा, अशी मूळ संकल्पना असणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यात येणार अाहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या नव्या पर्यटनाची मागणी वाढेल, असा विश्वास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया यांनी व्यक्त केला. या अानंदयात्रेचे अारक्षण एमटीडीसीच्या कार्यालयात तसेच िरझर्व्हेशन सेंटरवर केले जाईल.सुरुवातीच्या टप्प्यात केवळ मुंबई दर्शन यात्रा पर्यटकांना घडवली जाईल. पुढे त्यात एलिफंटा बेट, अजिंठा आणि वेरूळची लेणी, शिर्डी या ठिकाणांचाही समावेश केला जाणार अाहे.

ओळखपत्र सोबत अाणणे बंधनकारक
हेलिकाॅप्टरपर्यटनाचा अानंद घेण्यासाठी पर्यटकांना करांसहित प्रतिव्यक्ती ३२,००० रुपये शुल्क भरावे लागेल. टेकऑफसाठी किमान प्रवाशांनी बुकिंग करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना हे शुल्क लागू नसेल. पर्यटकांनी ओळखपत्र सोबत अाणणे बंधनकारक आहे.
Last modified on Thursday, 07 January 2016

Leave a comment

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners